Type Here to Get Search Results !

लोक कल्याण अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ

हडपसर, प्रतिनिधी, सतीश शिळीमकर यांकडून, भुकेलेल्यांना अन्न ही संतांची शिकवण, आचरणात आणणारे, राजाभाऊ होले, यांनी संतांच्या वंश ज्यांच्या हस्ते, लोक कल्याण अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ केला. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरव उद्गार संत निळोबाराय यांचे सातवे वंशज दामोदर महाराज मकाशीर यांनी काढले.
तुकाईदर्शन येथे, लोक कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने अन्नपूर्णा योजनेच्या,19 वी लाभार्थी , श्रीमती रूपाली बोरावके यांना, त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होईपर्यंत, धर्मा किराणा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला., यावेळी महाराज बोलत होते. व्यासपीठावर, ॲड. राम भुजबळ शिवसेना महिला आघाडी पुणे शहर संघटक विद्या होडे, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना राजाभाऊ होले ,म्हणाले , आपल्या संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व असून, गरजवंतांना त्याचा लाभ मिळावा या हेतूने ही ही योजना सुरू केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्राध्यापक एस . टी.पवार, वर्षा शेंडे यांनी प्रास्ताविक, दिलीप भामे , हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी, पांडुरंग शेंडे, चंद्रकांत वाघमारे, तुकाराम घोडके, राजाराम गायकवाड, व प्रवीण होले, यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments