Type Here to Get Search Results !

हडपसर विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठा निर्णायक बदल घडवत

हडपसर विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठा निर्णायक बदल घडवत काल *उल्हास भाऊ तुपे* यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश *महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार* यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि *हडपसरचे आमदार चेतन दादा तुपे पाटील* यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
उल्हास भाऊ तुपे यांच्यासारख्या जनाधार असलेल्या, कार्यकर्त्यांशी थेट नाळ जोडलेल्या नेतृत्वाच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे *निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस आधी झालेला हा प्रवेश हडपसरच्या राजकीय समीकरणांना पूर्णतः कलाटणी देणारा ठरला आहे*, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या प्रवेशाचा थेट फायदा *प्रभाग क्रमांक १५, १६, १७ आणि ४१* मध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रभागांमध्ये उल्हास भाऊंचा प्रभाव, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि स्थानिक पातळीवरील कामाचा विश्वास लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू अधिक भक्कम झाली आहे. दरम्यान, उल्हास भाऊ तुपे आणि नाना भानगिरे यांच्यात नुकत्याच काळात झालेल्या वादामुळे राजकीय समीकरणे आणखी तापली आहेत. या पार्श्वभूमीवर *उल्हास भाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नाना भानगिरे यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे*, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. भाऊंचा वाढता जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांवरील प्रभाव नाना भानगिरे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. उल्हास भाऊ तुपे यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक व राजकीय काम, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे ते अल्पावधीतच हडपसरच्या राजकारणातील एक प्रभावी चेहरा ठरले आहेत. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली असून आगामी निकालांवर याचा निर्णायक प्रभाव पडणार आहे.समस्याला वाचा फोडणारा अन्यायवृद्ध लढा देणार महाराष्ट्र 99 न्यूज जाहिरात बातमी व प्रतिनिधी नेमणूक साठी संपर्क पुणे जिल्हा उपसंपादक अविनाश गायकवाड.9921050702

Post a Comment

0 Comments