शिवसेना(शिंदे गट) पुणे जिल्हा प्रमुख यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा आणि शिवसेना (
January 12, 2026
0
हडपसर, प्रतिनिधी, सतीश शिळीमकर यांजकडून शिवसेना(शिंदे गट) पुणे जिल्हा प्रमुख यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र उल्हास भाऊ तुपे कोणत्या पक्षात जाणार याबद्दल गोपनीयता होती. यामुळे हडपसर व पुणे शहर व जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते . कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असे गेल्या पोचली होती. माननीय उल्हास तुपे हे पुणे शहर व जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जात होते. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आज सकाळी उल्हास भाऊ तुपे आज सकाळी उल्हास भाऊ तुपे यांनी नव्या राजकीय प्रवासासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली. आज सायंकाळी विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार व हडपसर विधानसभेचे माननीय आमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या, नेतृत्वाखाली, उल्हास तुपे जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती, विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
Tags

Post a Comment
0 Comments