पुणे - येथील महात्मा फुले मंडळाच्या वतीने समाजातील १०वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
July 25, 2025
0
*महात्मा फुले मंडळाचा १० वी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न...*
==================
*पुणे - येथील महात्मा फुले मंडळाच्या वतीने समाजातील १०वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम "सावतामाळी भवन" येथे संपन्न झाला.*
*या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हनुमंत सुदाम टिळेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चि. रोहन राजेंद्र पिंगळे ( UPSC परीक्षा उत्तीर्ण २०२५ ), सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. सुदाम दगडू धाडगे सर, सामाजिक कार्यकर्ते श्री. किरण गणपतराव हिंगणे व सौ. स्नेहल किरण हिंगणे उपस्थित होते. समाजातील ९३ विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले.*
*त्याचप्रमाणे समाजातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा मंडळाच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने श्री. महेशराव आनंदराव लोंढे (संपादक - साप्ताहिक एकच ध्येय भोसरी पुणे), ॲड. दिगंबर सोमनाथ आलाट, प्रा. पांडुरंग बाबुराव गाडेकर सर, डॉ. रवी पुंडलिक चौधरी, सौ सुनिताताई पोपटराव गारडी, ॲड. सौ. भावनाताई निलेश बोराटे, प्रा. सौ. शितलताई नितीन शेवते, सौ. अंबिकाताई अमोलदिप शिंदे, श्री. अमर अशोक शिंदे tआणि कु. अमृता बापूसाहेब म्हेत्रे आदींचा सत्कार करण्यात आला.*
*मा. सुदाम धाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्याला भविष्यात यशस्वी कसे व्हावे याबद्दलचे सुंदर मार्गदर्शन केले. २०२५ ची UPSC हि अवघड परीक्षा उत्तीर्ण करणारा चि. रोहन पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील करिअर विषयी सुंदर मार्गदर्शन केले. सौ. स्नेहल हिंगणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील प्रगतशील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषण श्री. हनुमंत टिळेकर यांनी करून कार्यक्रमाचा समारोप झाला.*
*या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गिरीश झगडे, पाहुण्यांचा परिचय श्री. दिगंबर आलाट व श्री. योगेश वाघोले, यादी वाचन प्रा. श्री. पांडुरंग गाडेकर सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिपक जगताप, तर आभार प्रदर्शन प्रा. चांगदेव पिंगळे सर यांनी केले.*
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि सभासद यांनी सहकार्य केले.* ▪️
🙏🌹🌹🚩🚩💐💐🙏
Tags

Post a Comment
0 Comments