हडपसरमध्ये दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत . पुणे , हडपसर प्रतिनिधी सतीश शिळीमकर
June 22, 2025
0
हडपसरमध्ये दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत . पुणे , हडपसर प्रतिनिधी सतीश शिळीमकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज सकाळी १०.३० वा. हडपसरमध्ये आगमन झाले.या सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरीच्या विठुरायाला दर्शनासाठी आनंदी सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री सत्संग प्रासादिक दिंडी हडपसर परिसर रथामागे क्रमांक २२, चे अध्यक्ष ,ह प भ ,श्री.रवींद्र भोसले, महाराष्ट्र 99 न्यूज चॅनलचे प्रतिनिधी डॉ. सुहास पायगुडे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केला होता.यामध्ये वारकऱ्यांना औषधे ,फराळ, रेनकोट वाटण्यात आले. कार्यक्रमात, डॉ. प्लॅविनी पायगुडे (निकम) ॲड. विवेक भोसले,विपुल भोसले,राहुल खाटापे ,समीर खाटपे,सागर भोसले यांनी सहभाग घेतला.
Tags

Post a Comment
0 Comments