Type Here to Get Search Results !

कृपया प्रसिद्धीसाठी हडपसर पोलीस आणि प्रणव मोरे मित्र परिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपलब्ध पुणे: प्रतिनिधी

प्रतिनिधी, सतीश शिळीमकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात देहभान विसरून भक्तिभावाने पंढरीच्या विठोबारायांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना विविध सेवा देण्यासाठी हडपसर पोलीस ठाणे आणि प्रणव... यांच्या वतीने उन्मेश हॉस्पिटल, गाडीतळ हडपसर येथे विशेष सेवा केंद्र उभारण्यात आले आहे.
या सेवा केंद्रात सर्दी, खोकला, ताप अशा सर्वसामान्य विकारांवर औषध उपचार, मसाज, कांस्यथाळी, अग्निउपचार, आरोग्य तपासणी, आवश्यकतेनुसार रक्तदाब, रक्तातील शर्करा पातळी तसेच मेडिकल इमर्जन्सी आवश्यक तपासण्या अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्याच्या प्रवासादरम्यान अचानक उद्भवणाऱ्या अपघात व आपत्तीमध्ये वारकरी अथवा अन्य भक्तांसाठी रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. गाडीतळ ते दिवे घाटा पर्यंत आणि सोलापूर रोडला लोणी काळभोर करतो पर्यंत ही सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन रुग्णवाहिका उपलब्ध राहणार असून एक रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात उपस्थित असणार आहे. या सेवांचा वारकरी आणि भाविक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शहीद भगतसिंग प्रतिष्ठान व हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments