वारंवार होणाऱ्या बदलामुळे वाहनचालक त्रस्त ,
June 12, 2025
0
.. हडपसर मगर पट्टा चौक येथे वाहतूक विभाग वारंवार बदल करीत असल्याने वाहनचालकामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून मगर पट्टा येथून मुंढवा कडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.त्यामुळे मेघासेंटर, नोबल हॉस्पिटल, मगर पट्टा हॉस्पिटल करिता जाणाऱ्या नागरिकांना वैधवाडी सिग्नल वरून वळून पुन्हा चौकात यावे लागते. हडपसर गाव पासून वैभवथिएटर पर्यंत वाहनांची नेहमी कोंडी असते.त्यातच वाहतूक विभागाने केलेला बदल किती योग्य आहे . लवकरात लवकर मगर पट्टा चौकात कायमस्वरूपी वाहतुकीची कोंडी सोडवण्यास उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना प्रमुख श्री. उल्हास तुपे यांच्या वतीने देण्यात आला आहे.पुणे प्रतिनिधी सतीश शिळीमकर
Tags


Post a Comment
0 Comments