फुरसुंगी नगरपरिषदेकडून नागरिकांची निराशा, पुणे प्रतिनिधी, सतीश
June 11, 2025
0
फुरसुंगी नगरपरिषदेकडून नागरिकांची निराशा, पुणे प्रतिनिधी, सतीश शिळीमकर, फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांसाठी गेल्या दीड वर्षांपासून नगरपरिषद झाल्यापासून विकासकामे रेंगाळलेली आहेत.या गांवात कचरा सांडपाणी वाहतुकीची कोंडी या समस्या तर आहेत. परंतु पावसाळी पूर्व कामे झाली नाहीत.त्यामुळे स्थानिक नागरिकांनामध्ये नगरपरिषदेच्या कारभाराविषयी संताप दिसून येतो . फुरसुंगी ,उरुळी देवाची ही गावे अगोदर महानगरपालिकेत होती,तेव्हा रस्ते, लाईट, पाणी,ड्रेनेज, इ.कामे होत होती.नगरपरिषद आल्यापासून ही कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत ,नगरपरिषदेचा कार्यभार सोपवले अधिकारी नावापुरतेच असून ,कुठलेही नियोजन नाही. आठवड्यातून एक दोन वेळा पाणी येते .माजी लोकप्रनिधी ,नेते यांचे ऐकत नाहीत,तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे ? राज्यात कोणत्याही शासन कारभाराशिवाय चाललेली ही एकमेव स्थानिक स्वराजसंथा आहे. तरी ही परिस्थिती व नगरपरिषदेमध्ये केव्हा सुधारणा होणार,असा सवाल, फुरसुंगीचे या.मा ग्रामपंचायत सदस्य श्री राजाभाऊ होले यांनी नागरिकांच्या वतीने केला आहे.
Tags

Post a Comment
0 Comments