Type Here to Get Search Results !

नारवट चे आंदोलन तीव्र झाले... मतदान वर बहिष्कार, रास्तारोको आणि पूर्ण गाव बसणार उपोषणाला

नारवट चे आंदोलन तीव्र झाले... मतदान वर बहिष्कार, रास्तारोको आणि पूर्ण गाव बसणार उपोषणाला
भोकर, प्रतिनिधी : सुंदर गाव स्पर्धेतून जिल्हा परिषदेकडून वगळण्यात आलेल्या नारवट गावाचे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून दि ३० मे रोजी नारवट चे सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहे. आर आर (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आलेल्या नारवट गावाची तपासणी न करता जिल्हा परिषद कडून या ग्रामपंचायत ला वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ व फेर तपासणी करण्याच्या मागणीसाठी दि. २७ मे पासून प्रा. नारायण कुमरे, सरपंच रामदास जोंधळे, उपसरपंच नागोराव झाडे हे आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाबाबत जिल्हा परिषद कडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नारवट येथील ग्रामस्थांनी बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने महिला आक्रमक झाल्या असून येथून पुढील सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर दि. ३० मे रोजी नारवट येथील लहान बालकापासून वृद्ध उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या नंतर हि जिल्हा परिषद कडून सकारात्मक विचार न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा हि यावेळी दिला गेला. या बैठकीला माधवराव लोखंडे, नागोराव डुकरे, साईनाथ कुमरे, गजानन कुमरे, कृष्णा कुमरे, नरसिंह चोपवाड, साहेबराव खुपसे, गजानन साखरे, बाबुराव सुर्यवंशी, अनिल जोंधळे, सुमन खुपसे, कमल ढोले, जनाबाई भालेराव, रागिणी सागरे, सागरबाई करंदीकर, निलाबाई लोखंडे या सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकटीसाठी ___ आता प्रशासनाला सहकार्य नाही आर आर (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत चांगले काम करून सुद्धा प्रशासन जाणूनबुजून नारवट कडे दुर्लक्ष करत असेल आणि सहकार्य करत नसेल तर या नंतर प्रशासनाला आम्ही सहकार्य करणार नाही. अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली.

Post a Comment

0 Comments