तुकाईदर्शन येथे रस्ता आणि चेंबर खचल्याने टेम्पो झाला पलटी,पुणे (प्रतिनिधी, सतीश शिळीमकर)
May 29, 2025
0
तुकाईदर्शन येथे रस्ता आणि चेंबर खचल्याने टेम्पो झाला पलटी,पुणे (प्रतिनिधी, सतीश शिळीमकर) तुकाईदर्शन ग्लायडिंग सेंटर लगतचा मुख्य रस्ता अवकाळी पावसाने या रस्त्याची चाळण झाली. पूर्वी हा रस्ता काँक्रीटचा होता.परंतु मागणी नसताना मार्च पूर्व निधी खर्ची टाकण्यासाठी मनपा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने या रस्त्यावर गेल्या महिन्यात ड्रेनेज लाईनचे काम केले.चांगला रस्ता फोडला. त्याची व्यवस्थित दुरुस्ती न करता,सिमेंटची बारीक पटी लावून सोडून दिला. या चेंबरमध्ये दुचाकीस्वार घसरतात, कालच एक टेम्पो पलटी झाला.सुपरवायझरच्या लक्षात आणून दिले ,तरी तो दुर्लक्ष करतो. तरी मोठा अपघात होण्याअगोदर, शनिमंदिर ते गणपती मंदिरापर्यंत रोड सपूर्ण डांबरीकरण करावे,अशी मागणी लोककल्याण प्रतिठाणनचे अध्यक्ष,श्री. राजाभाऊ होले यांनी केली.
Tags



Post a Comment
0 Comments