डॉ.बी जी गायकवाड यांचा सहपत्नीक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी केला सत्कार*
April 09, 2025
0
*डॉ.बी जी गायकवाड यांचा सहपत्नीक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी केला सत्कार*
मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर येथे भव्य दिव्य स्वरूपात शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांनी दखल घेऊन डॉ. बी.जी.गायकवाड यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला नुकत्याच ए.पी.जे अब्दुल कलाम एज्युकेशन आयकॉन अवार्ड पुरस्कार मिळाले असल्यामुळे व मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यामुळे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी दखल घेऊन डॉ.बी.जी गायकवाड यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.डॉ. बी.जी. गायकवाड यांचे अनेक ग्रंथ व पुस्तके प्रकाशित असून ते राजा शिवाजी विद्यालय बजाजनगर येथे तीस वर्षापासून अखंड सेवेत आहे.अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे उद्योगपती डॉ. मनोज जैन,डॉ.मैलापुरे, उमेश डावखर,डॉ. संजय गायकवाड, संतोष माने,डॉ.केशव मोहरकर, लक्ष्मण हिवाळे, प्रदीप वाघ, महेश पाटील,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Tags


Post a Comment
0 Comments