पावन चिंतन धारा आश्रमाने सनातन नववर्ष उत्सव साजरा केला. देशभरातून सनातन नववर्षाच्या शुभेच्छा यात्रांचे आयोजन करण्यात आले. या शुभेच्छा यात्रेत मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला.
पावन चिंतन धारा आश्रमाच्या अंतर्गत कार्यरत युवा अभ्युदय मिशनतर्फे देशभरात सनातन नववर्ष 2082 मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. त्याअंतर्गत विविध राज्यांतील 30 प्रमुख शहरांमध्ये बधाई यात्रांचे आयोजन करण्यात आले.
सनातन नववर्ष म्हणजे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा. हाच तो दिवस, ज्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली, असे मानले जाते. त्या निमित्ताने पावन चिंतन धारा आश्रमाचे सदस्य आणि अभ्युदय मिशनाचे तरुण लोकांपर्यंत पोहोचून शुभेच्छा देण्यासाठी यात्रेत सहभागी झाले.
या उत्सवाचा एक भाग म्हणून, जगप्रसिद्ध संत व दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक परमपूज्य डॉ. पवन सिन्हा 'गुरुजी' यांच्या मार्गदर्शनाखाली गाझियाबाद येथे पावन चिंतन धारा आश्रमातर्फे पुणे शहरात गारवारे शाळा पासून सुरु होऊन फर्ग्युसन महाविद्यालय पर्यन्त बधाई यात्रा काढण्यात आली.
शहरातील प्रमुख मान्यवर *विवेक कुलकर्णी* , RSS प्रमुख या यात्रेत सहभागी झाले होते. सनातन संस्कृतीच्या प्रसारासाठी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारे होत असलेल्या प्रयत्नांना मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ऋषीकुलशाळा प्रकल्पाचे महत्त्व सांगून विवेक टोळी यांचे आभार मानले.यात्रा एका ठिकाणाहून सुरू होऊन भारत मातेच्या आरतीने संपन्न झाली. तसेच, विविध संघटनांनी पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत केले.
या यात्रेत विविध शहरांतून शेकडो लोक सहभागी झाले होते. विशेषतः ऋषीकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी दुर्गा देवीच्या भजनांवर नृत्य सादर केले, जेणेकरून आजच्या तरुण पिढीला भारतीय संस्कृतीचे महत्त्व कळू शकेल.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जनतेला संबोधित करताना सनातन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसर सनातन संस्कृती आणि नवरात्रीच्या उत्साहाने भारलेला होता. सर्वत्र मातृदेवतेच्या जयघोषाचा जल्लोष अनुभवायला मिळाला.



Post a Comment
0 Comments