Type Here to Get Search Results !

अमृता प्रीतम स्मृती प्रित्यर्थ अभिवाचन स्पर्धा-2025

अमृता प्रीतम स्मृती प्रित्यर्थ अभिवाचन स्पर्धा-2025 अस्तिव संस्था आणि उन्मुक्त कलाविष्कार यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यस्तरीय पातळीवरील जेष्ठ साहित्यिक अमृता प्रीतम स्मृती अभिवाचन स्पर्धा - 2025 मेअठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे पर पडली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
अभिवाचन ही देखील एक कला आहे. आपण काय बोलतो ते समोरच्याला समजून देणे, त्यात त्याला खेचणे, आपल्या वाचण्याने त्याच्यात रस घेण्याइतपत गोडी निर्माण करणे, वाचनातून ते पात्र जिवंत करणे म्हणजे अभिवाचन. कविता वाचणे वेगळे, आणि कथा-कादंबरी वाचणे वेगळे, नाट्य रुपांतर वाचणे तर आणखी वेगळे. मी मा. लेखक रत्नाकर मतकरी यांना अभिवांचन करताना पहिले आहे, किशोर कदम (सौमित्र), रोहिणी हट्टंगडी, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. गिरीश ओक, अतुल पेठे यांना वाचताना पाहिलेले आहे. शब्दांची नजाकत, भावनांची देवाणघेवाण, मुद्रा अभिनय आणि आवाजाचा चढउतार हे अभिवाचन प्रकाराचे अलंकार...
तर... अशी अभिवचन स्पर्धा अस्तित्व संस्था - उन्मुक्त कलाविष्कार तर्फे दर वर्षी घेतली जाते. त्यात अनेक स्पर्धक अगदी मेहनतीने, अतिशय गंभीरपणे सहभागी होतात. मला तर व्यक्तीश: वाटतं की, नाटकाच्या सादरीकरणापेक्षाही अभिवाचन अवघड आहे. गेल्या दोन वर्षी मुंबई-कल्याण-डोंबिवलीतर विरार येथून स्पर्धक आले होते. पण या वेळी मात्र सोलापूर आणि रत्नागिरीवरून देखील स्पर्धक आले होते, सहभागी झालेले होते. दर वर्षीप्रमाणे जेष्ठ साहित्यिक अमृता प्रीतम यांचे साहित्य जास्तीतजास्त वाचले जावे म्हणून यांच्यावरील कथा, कादंबरी असेल तर अर्थात त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अभिवाचन स्पर्धा असल्याने त्यावरील साहित्य असल्यास 5 मार्क्स स्पर्धकांना वाढीव देण्यात येणार होते. शिवाय या वर्षी छ. शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बी आर. आंबेडकर, शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, प्रबोधनकार ठाकरे, साने गुरुजी, लक्ष्मीबाई टिळक, अहिल्याराणी होळकर, सावित्रीबाई फुले, दादासाहेब फाळके, ए.पी.जे. अब्दुल कलाम, नरेंद्र दाभोळकर, आणि जयंत नारळीकर यांच्यावरील कथा, कादंबरी, ललित, लेख अभिवाचनासाठी सादर करायच्या होत्या. साने गुरुजी यांच्या ‘हीच आमुची प्रार्थना , अन् हेच आमुचे मागणे’ यांच्या मानवता, समानता आणि मानसाने माणसाचा आदर करावा ही शिकवण देणाऱ्या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभिजित कांबळे आणि गिरीश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दोन गटांत ही स्पर्धा होती. एक म्हणजे शालेय गट आणि दुसरा खुला गट. शालेय गटात ‘शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिर या दादर येथील शाळेचे (म्हणजे एकाच शाळेचे ‘अ’ (5 विद्यार्थी) असे ‘ब’, ‘क’, आणि ‘ड’ असे चार गट होते.(म्हणजे एकाच शाळेची 20 मुलं!) आत्ताच्या सगळ्या कॉन्व्हेन्ट आणि इंग्रजी माध्यमापुढे, मराठी शाळा आपले ‘मराठीपण’ टिकून ठेवत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे तीन शिक्षक आलेले होते. एका स्पर्धेसाठी दादरहून ठाण्यात 20 मुलांना चार वेगवेगळे विषय घेऊन तयारी करून घेऊन येणे ही सोप्पी गोष्ट नक्कीच नाही. त्यासाठी त्या शिक्षकांचे देखील मनापासून कौतुक. आम्हाला परीक्षक म्हणून त्यांना गुण देताना आमच्या वेळी आम्ही शाळेतून अशा स्पर्धांमध्ये कसे सहभागी व्हायचो ते आठवलं. त्यांनी शिवाजी महाराज, स्वामी विवेकांनद, अमृता प्रीतम, डॉ. बी. आर. आंबेडकर अशा महापुरुषांच्या लेखांची निवड केली होती.
खुल्या गटात अमृता प्रीतम यांच्यावर 11 जणांनी सादरीकरण केले. भगतसिंह यांच्यावर दोन स्पर्धकांनी, अहिल्याबाई होळकर, सानेगुरुजी, आणि संत तुकाराम यांच्यावर एक सादरीकरण झाले. सोलापूर येथून आलेला ‘शब्दगंध’ या संघाने ‘विठोबाचं देणं’ हे अभिवाचन सादर केले, आणि ते पहिला क्रमांक पटकावून गेले (स्पर्धक - कुणाल बाबरे, रश्मी मोहळकर). दुसरा क्रमांक ‘अनुराधा ग्रुप’ (स्पर्धक - अनुराधा घाणेकर आणि शंकर चव्हाण) या संघाला मिळाला. तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. ते चंद्रशेखर ग्रुप रत्नागिरी (अभिवाचक - चंद्रशेखर पाटील आणि इतर) आणि अनुराधा/मधुरा - ठाणे या ग्रुपला मिळाले. उत्कृष्ट अभिवाचक हा मान आर्या ठोलिया यांनी मिळवला. उन्मुक्त कलाविष्कार (अंतर्गत) हा एक आयोजकांतर्फे गट केलेला होता. त्यांच्यातही ही स्पर्धा होती. त्यात प्रथम क्रमांक पिकासो ग्रुप डोंबिवली (स्पर्धक - मानस आणि रोहित) आणि उत्तेजनार्थ पारितोषिक इनोव्हेटीव्ह ग्रुप- डोंबिवली (स्पर्धक - अक्षय मनिष) यांना मिळाला. उत्कृष्ट अभिवाचक मानस दामले यांना मिळाला. स्पर्धा उत्तरोतार रंगत गेली आणि माझा आणि मा. संदेश गायकवाड यांचा अक्षरश: निकाल काढताना कस लागला. इतके वेगवगेळ्या प्रकारचे लिखाण, साहित्य वाचायला मिळाले. कलाकारांच्या मेहनतीतून त्यांचे सादरीकरण उत्कृष्ट होत गेले. लहान मुलांच्या गर्दीने, त्यांच्या उस्फुर्ततेने पूर्ण दिवसाला रंग चढला होता. परीक्षक म्हणून मा. संदेश गायकवाड हे वेळात वल काढून आले, आणि त्यांनी स्पर्धेच्या वातावरणात नाट्यकर्मी म्हणून भर घातली. या स्पर्धेला कार्यक्रमाचे रूप देणाऱ्या उन्मुक्त कलाविष्कारच्या सर्व टीमचे अगदी मनापासून आभार. या स्पर्धेची पूर्ण तयारी करणारी टीम गिरिश, रिया, स्वप्नाली, अभिजित, आनंद, सौरभ, संकेत यांनी न थकता अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत जे कष्ट घेतले ते खरोखर कौतुकास पात्र आहेत, याचे हे उत्कृष्ट उदाहरण. मनोज या आपल्या गुणी कलाकाराला साताऱ्याला असलेल्या कॉलेजला एक रविवारची सुट्टी काय मिळाली, तो या स्पर्धेच्या अभिवाचन टीमचा महत्त्वाचा दुवा बनला. रिया आणि स्वप्ना न थकता प्रत्येक गोष्ट बघत होत्या. गिरीश आणि विनायक सरांनी घेतलेली हरेक जबाबदारी महत्वाची ठरली. सौरभ डुबल गावी जायचे असूनही स्पर्धेत उतरला, त्याने प्रयत्न केला, त्याचे विशेष कौतुक. निकिता(मोठी), प्रतिष, रोहित, भूषण, तेजस, निकिता(छोटी), जुई, अजय तुमच्या मदतीसाठी आभार. बाकी मदतीसाठी आलेले विनायक काळे, सौरभ जाधव तुमचेही मनापासून धन्यवाद. अशा स्पर्धा होण्यासाठी पैशांची, प्रसिद्धीची मोठी गरज असते. त्यात हातभार लावणारे मा. जितेंद्र आव्हाड साहेब, दि ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे भारत सहकारी बँक लि., मॅजेस्टिक बुक डेपो, पूजा स्नॅक्स हे या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून जी काही फुल नि फुलाची मदत केली त्यासाठी संस्थेकडून मनापासून आभार. श्री. व सौ. अणसुरकर, श्री. कृष्णकांत सावंत, सौ. जयश्री धर्मा पाटील, श्री. रोहित कंपली, यांच्या कडून पुरस्कृत पारितोषिके होती, त्यांचेही मनापासून आभार. -उर्मी #अमृता_प्रीतम_राज्यस्तरीय_अभिवाचन_स्पर्धा_2025 #राज्यस्तरीय #स्पर्धा #अभिवाचन, #अमृताप्रीतम #उन्मुक्तकलाविष्कार

Post a Comment

0 Comments