रामानंद मिशन गुरुकुलम् आयोजित संत पूजन सोहळा सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा अपूर्व उत्सव. -
September 15, 2025
0
रामानंद मिशन गुरुकुलम् आयोजित संत पूजन सोहळा सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा अपूर्व उत्सव. - डॉ. भावार्थ देखणे.
@ गुरुकुलच्या दोनशे विद्यार्थ्यांचे एकाच मंचावर शास्त्रीय गायन बंदिशी सादर करून गुरूंना दिली अनोखी गुरुवंदना.
@किर्तन, दिंडी, टाळ, मृदंग रिंगणाच्या नामघोषात पुणेकरांनी अनुभवला वारीचा आनंद
@ जागतिक कीर्तीचे शास्त्रीय गायक पंडित डॉक्टर विकास कशाळकर सरस्वती भूषण, महंत महादेव शास्त्री यांना जगद्गुरु सेवा भूषण, तर जैन तपस्वी साध्वी डॉक्टर दर्शन प्रभाजी यांना आगमवादी आगम वाणी पुरस्काराने सन्मानित.
रामानंद मिशन गुरुकुल संचलित माऊली संगीत विद्यालय तथा जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन विश्वविद्यालयाच्या वतीने संस्थापक गुरू गणेश महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय संत पूजन व गुरु अभिवादन सोहळा आनंद दरबार येथे संपन्न झाला. याप्रसंगी गुरुकुल मधील २०० विद्यार्थ्यांनी डॉ. विकास यांनी संगीतबद्ध केलेल्या शास्त्रीय राग बंदिशींचे तसेच अभंगांचे गायन करून उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. वारकरी संप्रदायातील भजन कीर्तन दिंडी रिंगण सोहळा यामुळे या सोहळ्यात वारीच्या आनंदाची उधळण झाली.
वयाची 75 वर्ष भारतीय शास्त्रीय संगीत अभिजात संगीताचा तसेच संत संगीताचा प्रचार प्रसार करणारे जागतिक कीर्तीचे गायक डॉक्टर विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना सरस्वती भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मंदिर उभारून मराठवाड्यात प्रति देऊन निर्माण करणाऱ्या महंत महादेव महाराज बोराडे शास्त्रीजी यांना जगद्गुरु सेवा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. जैन साध्वी डॉक्टर दर्शन प्रभाजी यांना आगमवाणी पदाने सन्मानित करून त्यांचे संत पूजन करण्यात आले.
श्रीक्षेत्र आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार माऊली महाराज जंगले, बबन महाराज चोरगे, जैन साध्वी वात्सल्य मूर्ती इंदुप्रभाजी महाराज, पं. पांडुरंग मुखडे,अभिनव गंधर्व रघुनाथ खंडाळकर, ख्यातनाम गायक डॉक्टर संजय गरुड, वारकरी महामंडळ राज्याध्यक्ष कृष्णाजी रांजणे, रामदास महाराज भगत, संभाजी महाराज कोद्रे,महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष सचिन डिंबळे, गुरुकुलम चे कार्याध्यक्ष प्रशांत निगडे ,उपाध्यक्ष देविदास भगत, गुरुकुल संचालिका शुभांगी भगत,कौशल्य विकास मंत्रालय अधिकारी केशव धनगरे,नगरसेवक युवराज बेलदरे, विशाल तांबे, बाळाभाऊ धनकवडे, राणीताई भोसले, अश्विनी भागवत, शंकरराव बेलदरे, अशोक येनपुरे, कुलदीप कोंडे, नानासाहेब भिंताडे, प्रियांकाताई भोसले, कल्याणी मोर आदी मान्यवर उपस्थित होते.
जगद्गुरु तुकोबाराय किर्तन विश्वविद्यालयाचे प्राचार्य सचिन महाराज पवार यांनी प्रास्ताविक केले. आनंद दरबारचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देवकर तथा चंद्रकला नगरकर यांनी केले.
Tags



Post a Comment
0 Comments