जामनेर पोलीस स्टेशन शेजारील अतिक्रमणाला पोलिसांची मेहेरबानी? – जबाबदाऱ्यांनी टाळाटाळ केली
September 16, 2025
0
📰 जामनेर पोलीस स्टेशन शेजारील अतिक्रमणाला पोलिसांची मेहेरबानी? – जबाबदाऱ्यांनी टाळाटाळ केली!
जामनेर (प्रतिनिधी):
शहरातील जामनेर पोलीस स्टेशनच्या मुद्देमाल खोली शेजारीच झालेल्या अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित असताना उलट त्या अतिक्रमणधारकाला पोलीस स्टेशनकडूनच थेट वीज लाईन देण्यात आली आहे. या ठिकाणी घड्याळ दुकान सुरू असून, कायदेशीर परवानगीशिवाय चालणाऱ्या या व्यवसायाला पोलिसांची साथ असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
❌ नियम धाब्यावर
पोलीस स्टेशनसारख्या संवेदनशील परिसरात व्यापारी अतिक्रमण होणे आणि त्याला थेट पोलिसांची मदत मिळणे हे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गंभीर धोक्याचे लक्षण मानले जात आहे.
🤝 जबाबदार अधिकाऱ्यांची टाळाटाळ
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पत्रकारांनी अतिक्रमण धारकाला विचारणा केली असता त्यांनी थेट हवलदार तडवी यांचे नाव घेतले.
ही लाईन तडवी हवलदारांनी दिली आहे,” असे अतिक्रमणधारकाने सांगितले.
त्यानंतर हवालदार तडवी यांना विचारणा केली असता त्यांनी उद्धटपणे उत्तर दिले –
लाईन दिली आहे, तू मला काय रडत आहेस?”
यानंतर प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक कासार साहेब यांना विचारले असता त्यांनी सांगितले –
मी तपास करतो, पण सध्या मला ताप आहे.”
शेवटी पत्रकार गजानन तायडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन व्हॉइस मेलवर गेला. यानंतर पत्रकार गजानन तायडे यांनी संपूर्ण हकीकत व्हॉइस मेलवर नोंदवली आहे.
📢 नागरिकांचा संताप
या सर्व प्रकारामुळे जामनेर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जबाबदार अधिकारी सरळ उत्तर देण्याऐवजी टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
“जर पोलीस स्टेशनच्या शेजारीच असा बेकायदा प्रकार चालू असेल तर सामान्य नागरिकांसाठी कायद्याचा आधार उरतो कुठे?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
📌 पुढील दिशा
या अतिक्रमण व बेकायदेशीर वीजजोडणी प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. प्रकरण दडपून टाकले गेले तर ते न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत करणारे ठरेल, असे स्पष्टपणे सांगितले जात आहे.
Tags

Post a Comment
0 Comments