महात्मा फुले मंडळाचा शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न
June 26, 2025
0
*महात्मा फुले मंडळाचा शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न
*दरवर्षीप्रमाणे महात्मा फुले मंडळाच्या वतीने चवथी ते नववी पास माळी समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. हा कार्यक्रम "सावतामाळी भवन" येथे नुकताच संपन्न झाला.*
*या कार्यक्रमासाठी शालेय साहित्य वाटपाचे सौजन्य माननीय श्री. सुनील लक्ष्मणराव ताम्हाणे ( सामाजिक कार्यकर्ते मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे ) यांनी दिले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव रासकर, त्याचप्रमाणे वानवडी भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. उषाताई कृष्णा माळी उपस्थित होते. माळी समाजातील १०९ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे पाहुण्यांचे हस्ते वाटप करण्यात आले.*
*मा. उषाताई माळी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये चांगले कसे वागायचे याबद्दलचे सुंदर मार्गदर्शन केले. मा. सुनील ताम्हाणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील प्रगतशील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच माजी अध्यक्ष श्री. मधुकर राऊत व विश्वस्त श्री. दिपक जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री. गुलाबराव रासकर यांनी मंडळाच्या कार्याविषयी सदिच्छा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषण श्री. हनुमंत सुदाम टिळेकर यांनी केले.*
*या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे विश्वस्त श्री. गिरीश झगडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मंडळाचे विश्वस्त ऍड. श्री. दिगंबर आलाट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे विश्वस्त प्राध्यापक श्री. चांगदेव पिंगळे सर यांनी केले. विद्यार्थी यादी वाचन मंडळाचे सचिव प्राध्यापक श्री. गोरक्ष जगताप सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे विश्वस्त मा. श्री. पांडुरंग गाडेकर यांनी केले.*
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि सभासद यांनी सहकार्य केले.*
*जय ज्योती--जय क्रांती*
🙏🌹🌹🚩🚩💐💐🙏
Tags

Post a Comment
0 Comments