Type Here to Get Search Results !

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज*🙏 ----------------------------------------------- 🚩 *समाजाला भक्तिमार्ग दाखवणारे संत* 🚩

* ◆ *जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य करणारे गाथा लेखक, तुकाराम महाराजांच्या कीर्तनातील 14 टाळकऱ्यांपैकी एक संतु तेली.* संत श्री संताजी जगनाडे महाराजांचा (sant jagnade maharaj) जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी इ.स. ८ डिसेंबर १६२४ रोजी आई माथाबाई आणि वडील विठोबा या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे आजोळ मावळ तालुक्यातील सुदुंबरे हे होते. त्यांचे आई वडील हे दोघेही विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर बालपणापासूनच धर्म शास्त्राचे संस्कार झाले होते. लहानपणापासूनच त्यांना कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय होती. त्यामुळे नंतर ते संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यापैकी एक झाले. संताजी अत्यंत तल्लख बुध्दिमतेचे होते त्यांची निरीक्षणशक्ती अतिशय सूक्ष्म होती.
संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. ते रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात असत. त्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकूळ माणूस त्यांना दिसला. संताजीनी नैवेद्याच ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. परंतु नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजीनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी म्हणाले कि, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहान असतानाच त्यांना जनमानसातील ईश्वराची ओळख झाली होती. गुरु संत तुकाराम महाराज.. कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून समाजाला शिकवण देण्याचे,प्रबोधन करण्याचे कार्य संत नेहमीच करत आले आहेत. १७ व्या संत तुकाराम महाराजांची (sant tukaram maharaj) थोर समाजसुधारक आणि अन्यायाविरुद्ध लढणारे लोकनेते म्हणून ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. एके दिवशी संत तुकाराम महाराजांचे संताजींच्या गावात असणाऱ्या चक्रेश्वर मंदिरात कीर्तन होते. ह्या कीर्तनाला गावातली तसेच बाजूच्या गावाहून बरेच लोक आले होते. संताजीही कीर्तन ऐकण्यास गेले होते. संत तुकाराम महाराजांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या विषयावर पूर्ण कीर्तन केले. त्या किर्तनामुळे संताजींच्या मनावर मोठा प्रभाव पडला आणि त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. संताजीनी तुकाराम महाराजांची भेट घेतली. तेव्हा तुकाराम महाराजांनी संसार करत असताना परमार्थहि साधता येतो हे समजावून सांगितला. “ज्याने गुरु नाही केला, त्याचा जन्म वाया गेला” आपण अजूनपर्यंत गुरु केला नाही. गुरु शिवाय मार्ग मिळत नाही, गुरुशिवाय तरणोपाय नाही म्हणून त्यांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले. तेव्हापासून संत जगनाडे महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ वाजवीत होते. संत तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी होते त्यापैकी एक म्हणजे संत संताजी महाराज. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. *संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे लिखाण गंगाधर मवाळ आणि संताजी जगनाडे तेली हे करीत होते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या शिष्यास म्हणजे संताजी आणि गंगाधर मावळ यांना भगवान शिवाचे दर्शन करून दिले,अशी आख्यायिका सांगितली जाते. तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगाची गाथा रामेश्वर भट्टानी इंद्रायणीत बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ती अभंगाची गाथा पुनर्लिखित केली.* तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी म्हंटले आहे, “संताजी तेली बहु प्रेमळ | अभंग लिहित वसे जवळ | धन्य त्याचे सबळ | सांग सर्वकाळ तुक्याचा | “ संताजींच्या अथक परिश्रमामुळेच तुकारामांची अभंगाची गाथा जिवंत राहू शकली, असे म्हंटले आहे. साहित्य.. *जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. संताजी महाराजांनी ‘तेलसिंधु, ‘शंकरदीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचा नावाचे ग्रंथ लिहिले. त्यांनी सिंधु या ग्रंथातून तेलाच्या व्यवसायाची माहिती दिलेली आहे. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपके, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगातून झळकत..* “आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा | नंदी जोडीयेला मन पवनाचा || भक्ती हो भावाची लाट टाकीयीली। शांती शिळा ठेविली विवेकावरी।” मार्गशीष वद्य त्रयोदशी इ.स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला. जगद्गुरू संत तुकारामांनी संताजींना शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन दिले होते. परंतु संत तुकाराम महाराज जगनाडे महाराजांच्या आधीच वैकुंठाला गेले होते. ज्यावेळी संताजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले.जेव्हा तुकारामांनी ३ मुठी माती संताजींच्या डोक्यावर टाकली तेव्हा संताजींचे डोके आत गेले. चारिता गोधन, माझे गुंतले वचन || आम्हा झाले येणे एका तेलीया कारणे। तीन मुष्ठी मृतिका देख, तेव्हा लोपविले मुख || आलो म्हणजे तुका, संतु न्यावया विष्णु लोका।।” एका ज्ञानसाधकाच्या, प्रबोधनकाराच्या, तत्त्ववेत्त्याच्या ऐहिक आयुष्याला जरी मर्यादा असली तरी, त्यांच कार्य अमर्याद, असीम, अभंग आणि अखंडच असतं. समाजाचा भक्तिमार्ग प्रशस्त करणाऱ्या संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन… *‘तेली’ समाजाची ओळख व इतिहास -* ‘तेली’ हा शब्द त्रिलिंगी शब्दापासून तैलिंगी - तैलिक -तैली -तेली असा उत्क्रांत झाला आहे. ज्याचा अर्थ - तीन चिन्हे किंवा वर्णातील असा होतो. म्हणजे तेली क्षत्रिय, ब्राह्मण व वैश्य या तीन ही वर्णात होते. गुप्त राजे तेली होते, याबद्दल पटना गँझिटियर मध्ये मेसर्स ओ मेले व जेम्स या ब्रिटिश संशोधकांनी - ते प्राचीन तैलधाका किंवा तैलडहाका वंशाचे होते, असे लिहून ठेवले आहे. गुप्त प्रमाणेच साहू (मूळ शब्द साधू), भूती, वर्धन, प्रसाद, पाल, आप्पा ई. तेल्यांच्या पदव्या आहेत. भारतीय इतिहासातील मौर्य, गुप्त, वर्धन, भूती, नंदी, पाल, सोलंकी, मौखरी, चालुक्य, कलचुरी, वर्मन, चोळ, राष्ट्रकूट ई. राजघराणी तेली आहेत. तेली समाजातील प्रत्येक पोटजातीत शिव हेच प्रधान दैवत आहे. म्हणजे पूर्वी हे सर्व तैलिंगी शिवलिंग पूजक होते. तेली लोकांनी बियांपासून जो रस काढून उपयोगात आणला, त्याला ‘तेल’ हे नाव मिळाले. पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. ही महाराष्ट्रासह भारत व दक्षिण अशिया तसेच अन्यत्र आढळणारी एक जात आहे. महाराष्ट्रातील तेली समाजाचे आचारविचार आणि रूढी, प्रथा, परंपरा बहुजन समाजा सारख्याच आहे. या समाजाच्या महाराष्ट्र राज्यात साधारणत: २८ पोटशाखा आहेत. त्यात पंचम किंवा लिंगायत, कानडे, लाड, गुजर, अयार, कडू किंवा अकरमासे, कंडी, शनवार, शुकवार, राठोड, परदेशी, तिळवण आणि गंधी यांचा समावेश होतो. यापैकी तिळवण किंवा मराठे तेली या पोटजातींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर भारतात ७०० पेक्षा अधिक पोटजाती आहेत. याशिवाय समाजात अनेक पोटजाती आहेत. यात प्रामुख्याने मराठा तेली, देशकर तेली, क्षत्रिय तेली, एरंडेल तेली, बाथ्री तेली, साव तेली, सावजी तेली, छत्तीसगडी तेली, साहू तेली, हालिया तेली, साडिया तेली, एक बादिया तेली, चौधरी तेली आदि तेली जातीच्या उपशाखा आहेत. नागपूर भागात प्रामुख्याने एक बैले, दोन बैले किंवा तराणे आणि एरंडे अशा तेली समाजाच्या शाखा पोटशाखा आहेत. वर्धा जिल्ह्यात सावतेली हा समाज आदिवासी जमातीप्रमाणे राहतो, तर एरंडे तेली हे गावाबाहेर राहतात. साहू क्षत्रिय समाज विदर्भात मोठय़ा प्रमाणावर आहे. सैन्य दलात कामगिरी आणि शासनकर्ता समाज तेली समाजातील लोक फक्त तेल काढून विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत होते, असे नव्हे, तर त्यांनी काही काळ राज्यही केले होते. अनेकांनी सैन्य दलातही चांगली कामगिरी बजावली होती, असे इतिहासातील घटनांवरून स्पष्ट होते. अनेक तेली लोक अयोध्या येथील विजयादित्य राजाबरोबर अयोध्या सोडून आंध्र प्रदेशात लढण्यासाठी गेले होते. विजयादित्याने चालुक्य वंशाचे राज्य स्थापन केले होते. यात तेली समाजाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, असे दिसून येते. तेली जातीच्या सैनिकी व शासकीय सेवेतील योगदानाची स्तुती राजजोड गगुडा या राजाने एका अधिकारपत्रात केली आहे. या पत्रात राजा म्हणतो, ‘माझ्या राज्यात असे अनेक कर्मचारी आहेत, जे प्रामाणिक सेवा, साहस, स्वामीभक्ती व बुद्धीने काम करतात; परंतु यात तेली जातीचा पहिला क्रमांक लागतो.’ तत्कालीन अनेक प्रसंगांतून तेली समाजाच्या स्वामीभक्तीचा परिचय येतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या सैन्यात अठरापराड जातींच्या लोकांमध्ये तेली समाजाचाही समावेश होता. लढाईत तलवार चालविण्या बरोबर काही लोक सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था पाहत, त्यासाठी तेल-पाणी, घासलेट, मीठ- मिरची याची व्यवस्था हे लोक करत असत. छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी आले असता, मोगलांचा वेढा पडला. तेव्हा हातातील टाळ ठेवून संताजी जगनाडे महाराजांनी तलवार हाती घेऊन मोगल सैन्याचा प्रतिकार केला होता. सातारा जिल्ह्यात रमाबाई तेली उपाख्य तेलीणताई नावाची महिला सेनापती होऊन गेली. दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे सेनापती बापू गोखले यांच्याविरुद्ध कित्येक दिवस संघर्ष करीत या वीर महिलेने वासोटा किल्ल्याचे रक्षण केले होते. पुरुषाची वेशभूषा करून ताई तेलीणीच्या सैन्याने पेशवाईच्या सैन्याशी कडवी झुंज दिली. रणांगण गाजविणार्या तेलीन ताईचा तेली समाजात गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो. प्राचीन व मध्ययुगात तेली लोक सैनिक व सेनापती होते. काही काळ शासक म्हणून त्यांनी राज्य केले. आंध्र प्रदेशातील तेली समाजातील अनेक पिढय़ा सैन्यदलात सैनिका पासून ते सेनापती पदापर्यंत पोहोचल्याचेआढळते. तेली जातीत हिंदू तसेच इस्लाम या धर्मांचे प्रचलन आढळते. सहसा इस्लामधर्मीय तेली समाजाचा उल्लेख तेली या संज्ञेपेक्षा रोशनदार या संज्ञेने केला जातो. व्यापार-उद्योग व शिक्षण क्षेत्र तेली समाजाचा मुख्य व्यवसाय तेलविक्री असला, तरी अन्य व्यवसायांतही या समाजाने लक्षणीय प्रगती केलेली दिसते. कारखानदारी, लघुउद्योग, शेती, तसेच किराणा व्यवसायात समाजातील लोकांनी चांगली प्रगती केलेली दिसते. याशिवाय घाऊक व किरकोळ औषधविक्री व्यवसायात समाजाचे बहुसंख्य लोक आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तेली समाजाने प्रगती केली आहे. बीड तसेच विदर्भ (विशेषतः नागपूर जिल्ह्यात) तेली समाजाच्या अनेक शिक्षणसंस्था आहेत. अनेक उच्च पदांवर तसेच राजकारणात या समाजाचे लोक दिसून येतात. वर्तमान काळात भारतीय प्रजासत्ताकात ही जात ‘इतर मागासवर्गीय’ या प्रवर्गात गणली जाते. या समाजातील काही प्रसिध्द व्यक्ति - * संताजी जगनाडे महाराज (अंदाजे इ.स्. १६२४ - इ.स. १६८८) : मराठी संत तुकारामांनी रचलेल्या ‘तुकाराम गाथा’ या अभंगांच्या संग्रहाचे लेखन यांनी केले. देहू गावा जवळच्या सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य होते. * मेघनाद साहा (इ.स. १८९३ - इ.स. १९५६) : भारतीय खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ. * नरेंद्र मोदी : गुजराती, सध्याचे भारतीय पंतप्रधान व राजकारणी. * वेंकटेश प्रसाद : कन्नड, भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू. * नारायण तोताराम तेली (पांडव) : (इ.स.१८९०ते इ.स.१९७९) स्वातंत्र्य सेनानी, १९४७ पूर्वीच्या स्वातंत्र्य लढ्यात दोन वेळा त्यांना तुरुंगवास. (टाकळी वतपाळ, नांदुरा, जि.बुलढाणा)🙏🏻🙏🏻 आपला विजय विठ्ठलराव क्षीरसागर सचिव : दक्षिण विभाग तेली समाज अध्यक्ष : पतित पावन संघटना खडकवासला विभाग

Post a Comment

0 Comments