जालना नांदेड समृद्धी महामार्गातील नांदेड तालुक्यातील बारा गावातील
April 30, 2025
0
जालना नांदेड समृद्धी महामार्गातील नांदेड तालुक्यातील बारा गावातील बाधित
शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, शेतकरी कृती समितीच्या पत्रानुसार , दिनांक 29
/04/2025 मंगळवारी रोजी सकाळी 10 वाजता, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
येथे महत्त्वाची बैठक माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांच्या
अध्यक्षतेखाली विविध खात्यातील अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आपल्या
विविध मागण्या संदर्भात, व अडीअडचणी, बाबत , मागील मागण्या संदर्भात माननीय
तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या विविध बैठकीमध्ये चर्चेलेल्या
मुद्द्यावर अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. जसे की वास्तव बाजार
भावाप्रमाणे जमिनीचे मूल्यांकन करून अनुदान स्वरूपात मावेजा देणे. सर्विस रोड,
बागायती,त्या संदर्भात व विविध मागण्या बाबत अति महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले
आहे.तरी नांदेड तालुक्यातील बारा गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी संमती वाले व विना
संमती वाले या सर्व शेतकरी बंधूंनी वेळेत उपस्थित राहावे. 🙏🙏🙏 ही नम्र विनंती.
आपले विनीत. दासराव हंबर्डे, प्रमुख समन्वयक ,दीपक पाटील, अब्दुल माजीद शेठ , माधव
कदम, संतोष मस्के, तुळशीराम पाटील गिरे ,परसराम पाटील झरीकर , अशोक मोरे, गजानन
हंबर्डे, हरीश हंबर्डे, अतुल वाघ, व इतर कृती समितीतील शेतकरी बंधू. शेतकरी कृती
समिती जालना नांदेड समृद्धी महामार्ग नांदेड ९४२३१३६७५७ ,
प्रतिनिधी अनिल जाधव नांदेड
Tags

Post a Comment
0 Comments