Type Here to Get Search Results !

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित
*|| तालांजली ||* गेल्या महिन्यात म्हणजे दि. ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी अर्थातच गुरूदिनी *तालमणी पं. जयंत नाईक* यांना देवाज्ञा झाली. जळगाव आकाशवाणी, चांदोरकर प्रतिष्ठान, बालगंधर्व संगीत महोत्सवा सह जळगाव, नाशिकच्या सांस्कृतिक परिघाशी त्यांचं अतुट नातं होतं. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. असा हा प्रतिभासंपन्न कलावंत काळाच्या पडद्याआड गेला तो कायमचाच. अश्या या तालमणी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा शिष्य परिवार एकत्रित सहवादन करणार आहेत. पं. जयंत नाईक यांच्या कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व जळगावकर रसिक व संगीत प्रेमींनी या *कृतज्ञता तालांजलीस* उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता भाऊंचे उद्यान येथे संपन्न होत आहे.

Post a Comment

0 Comments