Type Here to Get Search Results !

रत्नागिरी येथे सुरू असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद

* *रत्नागिरी येथे सुरू असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची निकिता दिलीप पवार हिने मुलींच्या ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावुन बॅंगलोर येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात स्थान निश्चित केले, नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत सुद्धा तिने सुवर्णपदक पटकावले असून शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर अजित घारगे
याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे तिच्या या यशाबद्दल जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष श्री ललित पाटील, खजिनदार श्री सुरेश खैरनार, सचिव श्री अजित घारगे, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे, श्री महेश घारगे, श्री सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या*

Post a Comment

0 Comments